मी अनुभवलेली स्वप्नांची ताकद!

“माझी इच्छा आहे कि माझ्या मुलीनी खूप शिकावं आणि एक चांगला माणूस बनावं…..”

“माझ्या मुलांनी नेहमी समजूतदारीने वागावं आणि मोठ्या माणसांचा नेहमी आदर करावा….”

“मैं वह सबकुछ मेरी बेटी को देना चाहती हूँ जो मुझे नहीं मिला ताकि वह पढ़ लिख के खुद का और हमारा नाम रोशन करे…|”

“माझ्या मुलानी स्वतःच्या पायावर उभं रहावं आणि इतरांची ही मदत करावी….”

दुपारचे ४ वाजले असावेत. बाहेरच्या व्हरांड्यात मुलांची गडबड जाणवतं नव्हती आणि बाजूच्या वर्गातील शांतता टाचणी पडण्याची वाट पहात असावी. कदाचित मधल्या सुट्टी नंतरचा तास बाईंचा फेव्हरेट असावा. असो ! मी मात्र या स्वप्नांचा कौतुक सोहळा अनुभवण्यात दंग होते. मुसळधार सरींनी ही त्यांच्या सदिच्छा आणि आशिर्वादासह हजेरी लावली.

तिसरा क्रमांक आहे पुण्याचा. नाही म्हणजे पहिला क्रमांक पटकावला आहे पुण्यानी भारतात राहण्यास योग्य असणाऱ्या शहरांच्या यादीमधे. अभिमान आहे मला याचा. हा तिसरा क्रमांक म्हणजे सर्वात जास्त आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असणाऱ्या शहरांच्या यादीमधे! काय ते म्हणे ४०% लोकसंख्या म्हणजे जवळपास १४ लाख लोकं संपूर्ण पुण्याच्या २.३% तुकड्यावर वास्तव्यास आहेत. भयानक आहे ना? आणि हो, सर्वात जास्त झोपडपट्टीचा भाग हा पुण्याच्या मधोमध असणाऱ्या भवानी पेठेत आहे.

फक्त शब्द आणि आवाज कानावर पडले असते ना मला हि वाटलं असत कि ४-५ अत्यंत सुशिक्षित आणि नैतिक मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या काही व्यक्तींचा समग्रतेला साधून स्वतःच्या बुद्धीला पटेल असा संवाद होत असावा कदाचित. काही सुज्ञ पालक आपल्या मुलांविषयीची त्यांची स्वप्ने सांगत असावीत. व पु म्हणतात, प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणार असो, त्याच प्रस्थान मनातच हवं. आणि हि मनं प्रस्थानासाठी अगदी तयार आहे अस वाटत होत.

काशेवाडी – भवानी पेठेतली सर्वात मोठी झोपडपट्टी. हो, आलं आहे तुमच्या लक्षात!  हि ४-५ आणि त्यांच्या सारखी अजून बरीच काशेवाडी मधील मनं प्रस्थानासाठी तयार आहेत याची ग्वाही देणारा तो वरचा स्वप्नाचा संवाद पुरेसा होता. अगदी प्राथमिक शाळेचं तोंड पाहिलेली, नैतिकता हा शब्द कदाचित न जाणणारी, समग्र म्हणजे काय हे न समजणारी, बुद्धीचा माहित नाही पण अगदी मनाच्या त्या आतल्या कोपऱ्यापासून या ४-५ आईंची हि मनं आपापली स्वप्न कोरत होती. तेवढंच अफाट बळ आणि तेच असामान्य सौन्दर्य जे कदाचित सर्व सुख-सुविधा असणाऱ्या आणि आपल्या मुलांसाठी त्या सुविधा उपलब्ध करू शकणाऱ्या पालकांच्या स्वप्न-दृष्टीमधे असेल तेवढंच बळ आणि तेच सौन्दर्य ! मी अवाक होते.आज हि ती दुपार आठवली कि नकळत १०० हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. आता फक्त या प्रस्थानासाठी लागणारं योग्य आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि करीत राहीन.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s